Wednesday, 3 February 2010
जीर्ण कागदे !
आजच पाकिटात ठेवलेले कागदे काढत बसलो होतो। आणि खुप दिवसांपासून "सांभाळून" ठेवलेली पत्रे हाती लागलीत। जास्त नाहीत ती २-३ आहेत, पण ती पाकिटातुन निघताना स्वतः च्या अंगावर लिहिलेल्या सगळ्या भावना, क्षण, स्थळ सगळे सांगू लागले।
पण त्यांचा स्वर जरा नाराजच होता। आणि का नसावा? आज किती दिवसांनी माझे त्यांच्याकडे लक्ष गेले, त्यांना पाकिटात ठेवतांना किती विचार आले होते, खरे तर माहितच नव्हते की मी त्यांना का सांभाळतोय। हसू येतय स्वतः वर, कारण ? मला अजुनही उमगले नाहिये.
प्रत्येक घडी उघडतांना, भीती वजा काळजी सतवत होती। पाने इतकी झिजली होती की कोणत्याही क्षणी दोनाचे चार होतील, जसे आपण एकाचे दोन।
पण आज त्या गोष्टींना काही एक अर्थ नाहीये। सोबत घालवलेला प्रत्येक क्षण, आणि त्या प्रत्येक क्षणात दिल्या-घेतलेल्या शपथा ओघळलेले अश्रुअगदी सगळच त्या पत्रांप्रमाने धूसर अणि जीर्ण झालेत। म्हणुनच आज दिलेल्या प्रत्येक गोष्टीला दूर करताना इतके दुःख होत नाहीये जितके तू दूर जाताना झाले।
जातांना सगळे घेउन गेली असतीस तर बरे झाले असते। आज त्यांना स्वतःच्या हातांनी फाड़तांना हात कापले नसते।
Subscribe to:
Post Comments (Atom)


छान लिहितोस पंकज ...एकदम मनापासून ... मनातले ...
ReplyDeleteVelenusar janiva jari dhusar zalyat tari athavani matr titkyach spasht rahtat..n tya tashya rahtat karan apan tyana velebarobar mage sodaych ki nahi ha nirnay ghyaylach dhajat nahi..
ReplyDeleteExcellent words Pankaj..!